पीक नुकसानीचा आर्थिक मोबदला जाहीर करावा, दिवाकर रावते यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पीक नुकसानीचा आर्थिक मोबदला जाहीर करावा, दिवाकर रावते यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर –  पावसाने हुलकावणी दिल्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या नावावर राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांना कमी पावसाचा फटका बसलेला आहे. पीक नुकसानासाठी राज्य शासनाने आर्थिक मोबदला जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

यंदा पाऊस कमी आल्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे फार नुकसान झाले आहे. कापूस आणि काही प्रमाणात तूरीचे उत्पादन होईल. कर्जमाफी झाल्यानंतरदेखील विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यातच शेतक-यांना कर्जमाफी वेळेवर पोहोचू शकलो नाही. अगोदरचे कर्ज न भरल्याने नवे कर्ज मिळालेले नाही. अशा स्थितीत अस्मानी संकटामुळे गेलेल्या पिकाला आर्थिक मदत मिळावी ही शिवसेनेची भुमिका आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे, असे रावते यांनी सांगितले.

 

COMMENTS