विमानतळ , हॉटेल, मॉलमध्ये खाद्यपदार्थ किंवा पाणी घेताना होणारी लूट आता लवकरच थांबणार आहे. कोणत्याही खाद्यपदार्थ आणि कोल्ड ड्रिंकवर एमआरपीपेक्षा जास्त किंमत वसूल करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. केंद्रीय ग्राहक मंत्र्यालयाने हे आदेश दिले आहेत.
1 जानेवारी 2018 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार पाणी , सॉफ्ट ड्रिंक किंवा खाद्य पदार्थांवर कंपन्यांना जास्तीची किंमती आकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या कायदेशीर मोजणी विभागाच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ किंवा मॉलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ, कोल्डड्रिंक यांची क्वलिटी आणि क्वांटिटी तेवढीच असते पण इथे एमआरपीपेक्षा जास्त दर आकारत आल्यास त्यांच्यावर शिक्षेची कारवाई केली जाईल. असेही सांगण्यात आले आहे.
COMMENTS