राज ठाकरे यांच्याकडून पक्षात आणखी एक मोठा बदल

राज ठाकरे यांच्याकडून पक्षात आणखी एक मोठा बदल

मनसेचा महापालिका निवडणुकीत झालेला  दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पक्षात मोठा फेरबदल करण्यात येत आहे.  राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना आणखी एक धक्का देत. माजी नगरसेवक आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांना सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. महापलिका पराभवानंतर देशपांडे यांनी पक्षात फेरबदलाची मागणी केली होती. अलीकडेच देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमुळे पक्षात वाद झाला होता. राज ठाकरे यांनी मुंबईत विभागवार बैठकांमध्ये पक्षाच्या नेत्यांना दूर ठेवलेय. काही विभागांत पदाधिकारी बदलताना नेत्यांची संस्थानं खालसा ही करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या समर्थकांची उचलबांगडी करत नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या होत्या. विशेष म्हणजे भायखळा विभागात तर नांदगावकरांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या संजय नाईक यांचीच वर्णी लावत राज यांनी नांदगावकर गटाला जोरदार झटका दिला होता.

COMMENTS