मोदींचा खासदारांना सज्जड दम, तुम्हाला 2019 मध्ये बघून घेईन !

मोदींचा खासदारांना सज्जड दम, तुम्हाला 2019 मध्ये बघून घेईन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या खासदारांना चांगलंच फैलावर घेतलं. सातत्याने सांगूनही अनेक खासदार संसेदतल्या कामकाजाला गैरहजर राहतात. तुम्ही स्वतःला काय समजता ?  असले लाड मी खपवून घेणार नाही. जर तुमच्या वर्तनात बदल झाला नाही तर 2019 च्या निवडणुकीत बघून घेईन असा इशाराच त्यांनी दांडीबहाद्दर खासदारांना दम दिला. आज पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली त्यामध्ये मोदी दांडी बहाद्दर खासदारांवर चांगलेच भडकले होते.

COMMENTS