पटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांची सुरक्षा केंद्राने काढून घेतली. त्यामुळे हा लालू प्रसाद यादव यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप तेजप्रताप यादव यांनी केला. लालूंबाबत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू अशी मुक्ताफळे तेजप्रताप यादव यांनी उधळली आहेत.
विधानसभेच्या कामकाजासाठी आलेल्या तेजप्रताप यादव यांना माध्यम प्रतिनिधींनी लालू प्रसाद यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतल्याविषयी विचारणा केली. त्यावर तेजप्रसाद यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. लालू प्रसाद यादव यांच्या जीविताला कोणताही धोका झाला, तर त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
#WATCH: Lalu Yadav's son Tej Pratap responds to question on his father's security downgrade, says, 'Narendra Modi Ji ka khaal udhedva lenge' pic.twitter.com/FER7rIBjoK
— ANI (@ANI) November 27, 2017
COMMENTS