मोदी आताचे आणि 3 वर्षांपूर्वीचे, केंद्राच्या कामगिरीचा काँग्रेसकडून व्हिडिओच्या माध्यमातून पंचनामा

मोदी आताचे आणि 3 वर्षांपूर्वीचे, केंद्राच्या कामगिरीचा काँग्रेसकडून व्हिडिओच्या माध्यमातून पंचनामा

दिल्ली – काँग्रेस  पक्षाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजपच्या सरकारवर जोरदार प्रहार केला. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसतर्फे एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये मोदींची पंतप्रधान बनण्यापूर्वीची भूमिका आणि सरकारमध्ये आल्यानंतरही भूमिका याच्यामध्ये कसा फरक पडला आहे हे दाखवण्यात आले आहे. काश्मीर मध्ये शहीद झालेले जवान. पाकिस्तानचे हल्ले,  यावर व्हिडीओ च्या माध्यमातून काँग्रेसने टिका केली. सत्तेत येण्यापूर्वी मोदींचे पाकला आव्हान आणि आत्ताची मोदींची भूमिका, यात फरक असल्याचे दाखविले आहे. निवडणुकीपूर्वी मोदी आणि त्यांच्या पक्षाने मतदारांना अच्छे दिन येतील असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याच मोदींच्या मंत्रिमंडळाती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात- अच्छे दिन गले में अटकी हुई हड्डी है असं वक्तव्य केलं होतं. तेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटीला कसा विरोध केला होता आणि त्यांची जीएसटीबाबतची आताची भूमिका यावरही व्हिडिओमधून कोरडे ओढण्यात आले आहेत. पीक वीमाच्या माध्यमातून सरकारने खाजगी कंपन्यांना १० हजार कोटींचा फायदा मिळवून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विदेशातील काळा पैसा देशात आणू आणि प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकू असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. त्याचं काय झालं असाही प्रश्न यामध्ये मोदी सरकारला विचारण्यात आला आहे. तसेच बिहारला 125 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचे काय झाले असा सवालही करण्यात आला आहे.

COMMENTS