मोदी यांच्यापेक्षा शरद पवार यांना शेतीविषयक जास्त माहिती – राजू शेट्टी

मोदी यांच्यापेक्षा शरद पवार यांना शेतीविषयक जास्त माहिती – राजू शेट्टी

शेतीच्या प्रश्नाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जेष्ठ नेते शरद पवार यांना अधिक जाण असल्याचे वक्तव्य  खासदार राजू शेट्टी यांनी केले. पुणे शहरात आज परिवर्तन युवा परिषदेचे उद्घाटन झाले, त्यानंतर झालेल्या तरूणांना राजकारणात का यावे? परिसंवादात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

 

या कार्यक्रमात शेतीच्या प्रश्नांविसयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या दोघांपैकी कोणाला अधिक जाण असल्याचे विचारले असता खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना अधिक जाण असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. राजु शेट्टी यांनी आज अचानक शरद पवार यांचे कौतुक केल्याने राजकीय क्षेत्रात तर्कविर्तक लढवले जात आहेत.

 

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, विद्यार्थीदशेपासून शेतक-याच्या प्रश्नासाठी  लढत असून हा लढा शेवटपर्यंत राहणार आहे. शेतक-यासाठी ऋणमुक्ती अभियान हाती घेतले  आहे. त्याअंतर्गत आगामी 1 मे पासून शेतक-यांचा सातबारा कोरा करम्यासाठी सरकारविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त तरुणांनी राजकारणात येण्याची आवशक्यता आहे. जे नागरिक मतदान करत नाहीत ते ख-या अर्थाने देशाचे गुन्हेगार आहेत. जर त्या नागरिकांनी मतदान केले तर देशाच्या राजकारणात सक्षम पर्याय उपलब्ध होण्यास मदत होईल.

 

COMMENTS