मोर्चेकरांनी संभाजी राजे आणि नितेश राणेंना स्टेजवरच घेरले

मोर्चेकरांनी संभाजी राजे आणि नितेश राणेंना स्टेजवरच घेरले

मुंबई – एक मराठा, लाख मराठा म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला. यावेळी संभाजी राजे आणि नितेश राणे यांनी भाषण केले मात्र आपल्या भाषणात मराठा आरक्षण, कर्जमाफी आणि शिवस्मारकाबाबत काहीच आश्वासन दिली नाही. त्यामुळे संतप्त मोर्चेकरांनी त्यांना स्टेजवरच घेरले. जवळपास पाऊन तास घेरल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी नितेश राणे आणि मोर्चेकरांमध्ये शाब्दिक चकमकही झाली .

COMMENTS