यापुढच्या सर्व निवडणुका ‘ईव्हीएम’ द्वारेच होतील, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी केले आहे. अलीकडच्या अनेक निवडणुकांनंतर वादात सापडलेल्या ‘ईव्हीएम’बाबत निवडणूक आयोगाने आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘ईव्हीएम’बाबत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत.
‘ईव्हीएम’ हॅक करता येतात ही अफवा पसरविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतातील ईव्हीएम मशीन या परदेशातील ईव्हीएमपेक्षा अधिक दर्जेदार आहेत. ईव्हीएमला टॅम्पर प्रुफ बनवण्यासाठी अनेक स्तरांवर तपासणी, चाचणी केली जाते. महाराष्ट्रात एका उमेदवाराला शून्य मतदान मिळाल्याची चर्चा झाल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशी केली. त्या उमेदवाराला बरीच मते मिळाली होती, असेही त्यांनी सांगितले.
ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीटी म्हणजेच मतदानाची पावती जोडल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल, त्यानंतर सगळ्या शंका दूर होतील, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. झैदी यांनी सांगितले. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या दोन भारतीय कंपन्या अशा ईव्हीएम तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
COMMENTS