मुंबई – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आज ‘मातोश्री’ वर गेले होते. यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेेेंना आवाज करणारा वाघ आणि बांबूपासून बनवलेला झेंडा भेट दिला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ”1 जुलै ते 7 जुलै वनसप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सुरुवात 1 जुलैला ऐरोली मधून होणार आहे. याचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यासाठी आलो होतो. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. 1 जुलैला मुख्यमंत्री, राज्यपाल, उद्धवजी, मंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.”
मेट्रोच्या प्रकल्पात कमीत कमी झाडे तोडली जावीत याबाबत आम्ही अतिशय गंभीर आहोत. कायदेशीर नियमानुसार ही झाडे तोडली जात आहेत. पण त्यापेक्षा 100 पटीनं झाडे लावली जावीत असे मेट्रो प्राधिकरणाला सांगितले आहे. असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
”गेल्या वर्षी 1 जुलैला युतीचे म्हणून एक झाड माहीमला लावले होत ते नीट आहे काळजी करू नये,” भेटींमुळे आमच्यातला तणाव कमी होऊन मैत्री वाढावी असे प्रयत्न होत असतील तर चांगले असल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवारांनी दिले आहे.
जिल्हा बँकांच्या नोटा बदलून देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना मुनगंटीवार म्हणाले, नोटा बदलून मिळाल्याने कॅश फ्लो वाढेल. जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा पडून आहेत त्यामुळे जिल्हा बँकांना अडचणी येत आहेत त्या बदलून द्याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्राला मागणी केली आहे.”
अमिताभचे चित्रपट पाहातात पण त्यांना GST चा ब्रँड अँबेसिडेंर करू नका अशी मागणी करतात. संजय निरुपम बहुदा बरेच दिवस बातम्यांवर झळकले नसावेत म्हणून ही मागणी केली असावी असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.
सिंचन घोटाळ्याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल
कायदा कोणालाही सूट देत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे एक नेते 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. तपास योग्य यंत्रणा करीत आहेत. सिंचन घोटाळ्याबाततचे सत्य लवकर समोर येईल.
COMMENTS