नरेंद्र मोदींवर सिनेमा, अक्षयकुमार साकारणार मोदींची भूमिका ?

नरेंद्र मोदींवर सिनेमा, अक्षयकुमार साकारणार मोदींची भूमिका ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लवकरच सिनेमा निघणार असून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मोदींची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. अक्षयकुमार सध्या देशभर त्याच्या टॉयलेट या सिनेमाचं प्रमोशन करतोय. नुकतीच त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर या सिनेमाची चर्चा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. अक्षयकुमार याच्यासोबतच परेश रावल आणि अनुपप खेर यांचंही नावं मोदींच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. मात्र अक्षय कुमार हाच मोदींची भूमिका योग्य प्रकारे करु शकेल असा विश्वास भाजपचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे अक्षयच मोदींची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. सध्या अक्षयकुमारने सामाजिक कामातही मोठा पुढाकार घेतला आहे. आणि त्याची भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी जवळीकही वाढली आहे.

COMMENTS