राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मीरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मीरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.

मीरा कुमार या पहिल्या महिला लोकसभा आध्यक्ष आहेत. पाच वेळा त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे स्थान भूषवले आहे. एनडीएकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी दलित उमेदवार दिल्यानंतर यूपीएकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर यूपीएकडून मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता रामनाथ कोविंद आणि मिरा कुमार यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी प्रचाराला साबरमती आश्रमापासून सुरुवात करणार आहे. तसंच येत्या 1 तारखेला त्या पटनाहुन दिल्लीला जाणार आहे. तिथे यूपीएच्या घटकपक्षांशी चर्चा करणार आहे.

COMMENTS