येत्या 7 दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

येत्या 7 दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि आता राज्य मंत्रिमंडळातही विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.  2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांना लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आता येत्या 7 दिवसात राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील बदलाची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळातील होणाऱ्या विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का याबाबत खुलासा झाला नसून, अकार्यक्षम मंत्र्यांना पायउतार करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कमी आणि मंत्रिमंडळात फेरबदल जास्त असेल, अशी माहितीही समोर आली आहे.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए घोटाळ्यामुळे आणि एमआयडीसीतील घोटाळ्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या चौकशीसाठी समितीही नियुक्त केली आहे. मात्र आता यांच्या बाबत काय निर्णय घेतला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

COMMENTS