येथे प्रधानमंत्री आणतात भाजी तर राष्ट्रपती जातात शेळ्यांना चारण्यासाठी…

येथे प्रधानमंत्री आणतात भाजी तर राष्ट्रपती जातात शेळ्यांना चारण्यासाठी…

शेक्सीपिअरने नावात काय आहे असे म्हटले होते. परंतु राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात मुलांची नावे अशी अजब-गजब ठेवली आहेत, की नावात सर्व काही आले आहे, असेच तुम्ही म्हणाल. आपल्या मुलांना ‘राष्ट्रपती’, ‘प्रधानमंत्री’; तसेच ‘सॅमसंग’, ‘अँड्रॉइड’, ‘सिम कार्ड’, ‘मिसकॉल’ अशी गंमतीशीर नावे दिली आहेत. यामुळे येथे प्रधानमंत्री भाजी आणताना, राष्ट्रपती  शेळ्यांना चारण्यासाठी तर कलेक्टर दूध विकायला गेला आहे, असे संवाद ऐकायला मिळतात.  
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुंदीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेले रामनगर गावाची लोकसंख्या सुमारे ५०० एवढी आहे. पण गावातील लोक मुलांना आवडीप्रमाणे वाट्टेल ती नावे ठेवण्यात संकोच बाळगत नाहीत. यामुळेच गावातील बहुसंख्य लोक निरक्षर असले, तरी येथे ‘कलेक्टर’,  ‘मॅजिस्ट्रेट’, ‘आयजी’, ‘एसपी’ आहेत.
एकाच घरात एका व्यक्तीचे नाव तर चक्क ‘काँग्रेस’ असे असून, त्याने कुटुंबातील सर्वांची नावे ‘सोनिया’, ‘राहुल’, ‘प्रियांका’ अशी ठेवली आहेत.

एका खटल्यामध्ये उच्च न्यायालयाकडून आजोबांना जामीन मंजूर झाला. यावेळी कुटुंबात जन्मलेल्या नवजात बालकाचे नाव ‘हायकोर्ट’ असे ठेवण्यात आले. अनिर्या गावामध्ये मीना समाजातील मुलींची नावे ‘नमकीन’, ‘जलेबी’, ‘मिठाई’ अशी आहेत. तर जिल्ह्यातील नैनवा भागात प्रामुख्याने मोगिया व बंजारा जमातीचे लोक राहतात. येथे तंत्रज्ञानाची आवड असलेल्या या समाजातील अनेकांची नावे चक्क ‘नोकिया’, ‘सॅमसंग’, ‘चिप’, ‘जिओनी’ अशी ठेवली आहेत. नैनवा आरोग्य केंद्रातील अधिकारी रमेशचंद राठोड यांनीही सुरुवातीला मुलांची नावे अशी अजब-गजब ठेवण्यात आल्याने आश्चर्य वाटल्याचे सांगितले.

 

COMMENTS