येशू ख्रिस्तांचा उल्लेख भगवान ऐवजी हैवान, गुजरात बोर्डाचे चौकशीचे आदेश !

येशू ख्रिस्तांचा उल्लेख भगवान ऐवजी हैवान, गुजरात बोर्डाचे चौकशीचे आदेश !

गुजरातच्या पाठ्यपुस्तकात येशू ख्रिस्तांचा उल्लेख चक्क हैवान असा करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरातमधील संतापलेल्या ख्रिस्ती समाजाने गुजरात पाठ्यवुस्तक मंडळाच्या अध्यक्षांना याविषयी जाब विचारला. तेंव्हा या प्रकरणाची चौकशी करु आणि दोषींवर कठोर कारवाई करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तोपर्यंत डीटीपी ऑपरेटरला हटवण्यात आलं आहे. सर्व पुस्तके मागे घेण्यात आली असून नवीन पुस्तके छापण्यात येणार आहेत. नवीन पुस्तकांमध्ये हैवानच्या जागेवर भगवान असा शब्दप्रयोग केला जाणार आहे.

COMMENTS