नेवाळीत संचारबंदी, शेतकरी आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नचा गुन्हा – पोलीस आयुक्त

नेवाळीत संचारबंदी, शेतकरी आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नचा गुन्हा – पोलीस आयुक्त

कल्याण – नेवाळीतील जमीन अधिग्रहणावरुन पोलीस आणि गावक-यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता थोडा थंडावलाय. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी दिलीय. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे संचारबंदी जारी करण्यात आली असून जमावबंदीचेही आदेश देण्यात आले आहेत. काही गावक-यांनी पोलीस उपायुक्त आणि पोलिसांवर हल्ला केला त्यावेळी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यामध्ये 4 शेतकरी जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिलीय. काही आंदोलक हिंसक बनले त्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 12 पोलीस जखमी झाले असून आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

COMMENTS