योगी आदित्यनाथ यांच्या मठाचा खजिनदार मुस्लिम !

योगी आदित्यनाथ यांच्या मठाचा खजिनदार मुस्लिम !

गोरखपूर – उंत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी मुस्लिमांबद्दल अनेकदा प्रक्षोभक विधाने केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही योगी आदित्यनाथ यांच्यासह अमित शहा आणि पंतप्रधांनीही धार्मिक ध्रुवीकरण करणारी विधानं प्रचारसभेत केली.  एवढच नाही तर उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपनं एकाही मुस्लिम व्यक्तीला पक्षाची उमेदवारी दिली नाही. योगी आदित्य नाथ यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे अनेक वादही निर्माण झाले. त्यामुळेच ते कट्टर मुस्लिम विरोधक असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. असं असलं तरी त्यांच्या मठाच्या आर्थिक नाड्या या एका मुस्लिम व्यक्तीच्या हातात आहेत. त्याचं नाव आहे यासिन अन्सारी….. योगी आदित्यनाथ यांच्या मठातल्या यासिन अन्सारी यांनी छोटे महाराज असंही म्हटलं जातं. ते योगी यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात.

 

सभांमधून किंवा मीडियाच्यासमोर योगी आदित्यनाथ हे कधी मुस्लिमांबद्दल फारसे चांगले बोललेले दिसत नाहीत. मात्र यासिन अन्सारी यांचे मात्र ते तोंडभरुन कौतुक करतात. मी त्यांच्या घरात सहज वावरतो, त्यांच्यासोबत जेवतो असंही योगी आदित्यनाथ सांगतात. यासिन अन्सारीही योंगीचं तोंडभरुन कौतुक करतात. गरीबांना मदत करताना योगी आदित्यनाथ हे कधीही धर्म किंवा जात पहात नाहीत असं अन्सारी सांगतात. यासिन यांचे मोठे काका या मंदिरात आले आणि तेव्हापासून हे कुटुंब इथलंच होऊन गेलं. यासिन यांच्या सासू मठाच्या स्वयंपाकघर सांभाळतात, तर सासरे माळी आहेत. एवढच नाही तर गोरखनाथ मंदिराच्या आसपास अनेक मुस्लिम व्यक्तींची दुकाने आहेत.  त्यामुळे आदित्यनाथ यांच्या मुस्लिम तिरस्काराबद्दल काहीही बोललं जात असलं किंवा ते जाहीर भाषणातून कितीही प्रक्षोभक भाषणे करत असले तरी ते केवळ मतांसाठी आणि निवडणुकीपुरतं असतं वस्तूस्थिती मात्र वेगळी आहे. हे यातून तरी कमीतकमी दिसून येते.

COMMENTS