रस्त्यावर खड्डे पडलेत, आभाळ कोसळलं नाही –  चंद्रकांत पाटील

रस्त्यावर खड्डे पडलेत, आभाळ कोसळलं नाही – चंद्रकांत पाटील

परभणी  – रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, पाऊस पडला की खड्डे पडतात, असं  वादग्रस्त वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. परभणीत ते आज बोलत होते.

15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी  केली होती. रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असे चंद्रकात पाटलांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचे खापर चक्क आधीच्या सरकारांवर फोडले आहे. ‘याआधीच्या सरकारच्या काळात भरीव निधी मिळाला नाही, त्यामुळे चांगले रस्तेच बनले नाहीत. खड्डे जुनेच आहेत नवीन खड्डे पडले नाही.’, असं म्हणत त्यांनी आपल्या सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. 15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

‘आधीच्या सरकारच्या काळात भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे रस्ते जास्त काळ टिकतील असे  बनले नाहीत. रस्त्यांवरील खड्डे हे जुनेच आहेत. आता नव्याने खड्डे पडलेले नाहीत.’ असे अजब दावा त्यांनी केला.

COMMENTS