‘राज’गर्जना आता फेसबुकवर…

‘राज’गर्जना आता फेसबुकवर…

मुंबई –  राजकारणात सोशल मीडियाचा वापर आता लक्षणीयरीत्या वाढला आहे. राजकीय पक्षांचे नेते याला महत्त्व देऊ लागले आहेत. सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अनेक राजकीय नेते फेसबुक आणि टिवटरवर सक्रीय असतात. आता आणखी एक नेता आता फेसबुकवर येत आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे आता फेसबुकवर पाहता येणार आहेत. 21 सप्टेंबरपासून राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे फेसबुकवर पाहता येतील. राज ठाकरेंच्या फेसबुकवरील एन्ट्रीचा विशेष प्रोमो मनसेकडून तयार करण्यात आला आहे. हा प्रोमो मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आला आहे.यासंदर्भात मनसेने  त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर’ असे शीर्षक त्याला देण्यात आले आहे. त्यामुळे राज यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे आता सोशल फेसबुकवर पाहायला मिळणार आहे.

COMMENTS