राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत आणि भाजपला पहिला दणका !

राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत आणि भाजपला पहिला दणका !

सांगली – जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत आपआपल्या ताकदीप्रमाणे जागा वाटप करुन घेण्याचा निर्णय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी घेतला होता. त्यानुसार 14 जागा या बिनविरोध निवडूण आल्या. तर 13 ठिकाणी निवडणूक झाली. 13 पैकी 12 ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार निवडूण आले.

एका जागेसाठी मात्र राजू शेट्टी गटाच्या सुरेखा आडमुठे आणि सदाभाऊ खोत गटाच्या सुरेखा जाधव यांच्यात लढत झाली. अर्थात सदाभाऊ खोत यांच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा होता. तर राजु शेट्टी यांच्या उमेदवाराला काँग्रेस नेते विशाल पाटील यांचा उघड पाठिंबा होता. विशाल पाटील यांची दोन मते राजु शेट्टी यांच्या उमेदवाराला पडली. तर माजी मंत्री जयंत पाटील यांनीही त्यांची 3 मते राजु शेट्टी यांच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकली. त्यामुळे काहीही ताकद नसलेल्या राजू शेट्टी यांच्या उमेदवार सुरेखा आडमुठे या विजयी झाल्या.

काँग्रेस राष्ट्रवादीने राजु शेट्टी यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत पुढील राजकारणाची दिशा काय असेल याचेच संकेत दिलेत असं म्हणावं लागेल.

COMMENTS