राज्यभरात फुटबॉलचा फिवर, अख्ख मंत्रीमंडळ फुटबॉलमध्ये दंग !

राज्यभरात फुटबॉलचा फिवर, अख्ख मंत्रीमंडळ फुटबॉलमध्ये दंग !

राज्यभरात फुटबॉलचा फिवर चढला  आहे. भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये आज फूटबॉल खेळला जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिमखाना इथे या महोत्सवाचे उद्घाटन केले.   फूटबाॅल मॅच फीवर सगळीकडे व्हावा यासाठी उपयोगी उपक्रम असून,  उत्तम आरोग्य यासाठी फूटबाॅल खेळायलाच हवे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे,आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होते.

पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी राज्य सरकारच्या क्रीडा विभागानं हा उपक्रम सुरू केला आहे. देशात फुटबॉलला चालना मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. याअंतर्गत मुंबई जिमखाना इथं आठ वेगवेगळे सामने होणार असून एकट्या मुंबईत तीन लाखांहून अधिक मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे 200 मैदानांची यासाठी आखणी करण्यात आली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांनीही फुटबॉल खेळला होता.

कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं. शासनाच्या अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या उपक्रमात जळगावात एकाच दिवशी सुमारे 18  हजार विद्यार्थी फुटबॉल मॅच खेळण्यासाठी एकत्र आलेय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी खेळाडूंचा फुटबॉल खेळातील उत्साह वाढविण्यासाठी स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पंधरा मिनिटे मैदानात उतरून सामना खेळले. महाजन खेळाडूच्या वेशात मैदानात बुटबॉल खेळायला उतरल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनी गोलही केल्याने. सुरवातीचा सामना चांगलाच रंगात आला होता. जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, महापौरदेखील फुटबॉल खेळले.

 

 

COMMENTS