गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागाने आज छापेमारी केली. यानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. ‘राज्यसभेच्या गुजरातमधील एका जागेवर विजय मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो’, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. तर भाजपनेे सूडभावनेतून काँग्रेसच्या नेत्याच्या रिसॉर्टवर छापेमारी केली आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस नेत्याच्या रिसॉर्टवरील छापेमारी हा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. दरम्यान, शिवकुमार यांच्या रिसॉर्टवरील छापेमारीचा मुद्दा काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेतही लावून धरला. रिसॉर्टवरील छापा हा भाजपचा कट असल्याचं काँग्रेसच्या सदस्यांनी म्हटलं. तर काँग्रेसच्या आमदारांना घाबरवण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.
COMMENTS