मुंबई – राज्याच्या राजकारणात आज तीन महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्यातली पहिली घडामोडी म्हणजे ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांची. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनीच आपण आपला निर्णय घटस्थापनेच्या दिवशी घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे राणे आता काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतात की काँग्रेसमध्येच राहतात ? भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतात की स्वतंत्र्य पक्ष काढण्याचा निर्णय घेतात की पुन्हा वेट अँड वॉच हे उद्याच कळणार आहे.
दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे राज्यमंत्री आणि स्वाभीमानी शेतकरी सघंटनेतून नुकतेच निलंबित झालेले नेते सदाभाऊ खोत उद्या आपल्या नवा शेतकरी संघटनेची घोषणा करणार आहेत. सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनेचं नाव काय असेल. त्यांच्यासोबत कोण असेल. या कार्यक्रमाठी कोण हजेरी लावणार आणि सदाभाऊ यावेळी काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
तिसरी महत्वाची घडामोड म्हणजे राज ठाकरे यांच्याविषयीची. खरंतर एखादी व्यक्ती फेसबूकवर येते यामध्ये फारसं नावीन्य राहिलं नाही. मात्र राज ठाकरे फेसबूकवर येणार याची मोठी जाहीरात करण्यात येत असून त्याच्यासाठी उद्या एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. फेसबूवरुन राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातील फटकारे पहायला मिळणार आहेत. व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे नावारुपाला आले होते. तोच धागा पकडत फेसबूकवरुन राज ठाकरे यांच्यातला व्यंगचित्रकार आणि त्यातून राजकारण्यांना ओढण्यात येणारे आसून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता याचा राज आणि मनसेला किती फायदा होतो ते येणारा काळच सांगेल.
COMMENTS