शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी करत शिवसेना सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता ‘ढोलनाद’ करणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली असली, तरी अद्याप प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पैसेच आले नाहीत. त्यामुळे ज्याप्रकारे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारात बॅंकेचे अधिकारी वसुलीसाठी येतात, तसेच आता शेतकऱ्यांसाठी शिवसेना त्वरित कर्जमुक्तीसाठी बॅंकांच्या दारात ढोल वाजवणार आहे.
COMMENTS