राज्यात नवी राजकीय समिकरणे ?

राज्यात नवी राजकीय समिकरणे ?

राज्यात भाजप शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यांतले संबध कमालीचे ताणले आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी होण्यापूर्वीपासून सुरू असलेला हा ड्रामा तीन वर्षानंतरही सुरूच आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहणयाची एकही संधी सोडत नाहीत. संधी मिळेत तिथे एकमेकांवर कुरघोडी करणे, एकमेकांचे खच्चीकरण करणे हे सुरूच आहे. केवळ नाईलाज म्हणून दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दोन्ही पक्ष आता तुटेपर्यंत ताणण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळेच की काय आता राज्यात नवीन समिकरणे तयार होत असलयाचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना हे राजकारणातले कट्टर विरोधक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र येत आहेत. मालेगाव आणि भिवंडी या मुस्लिमबहुल महापालिकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. मालेगाव महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर त्या खालोखाल राष्ट्रवादीला जागा मिळाल्या. वास्तवीक दोन्ही काँग्रेस एकत्र येणं अपेक्षीत होतं. मात्र तसं झालं नाही. मालेगावमध्ये दोन्ही काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे ते एकत्र न येता काँग्रेस आणि शिवसेना यांनी चक्क युती केली आहे. काँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा महापौर तिथे निवडूण आला आहे.
भिवंडी निजामपूर महापालिका निवडणूकीत तर काँग्रेसला चक्क स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेतले आहे. तिथेही काँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर झाला आहे. भिवंडीमध्ये काँग्रेसपाठोपाठ दुस-या क्रमांकाच्या जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपने तोडफोडीची तयारी केली होती अशी चर्चा आहे. काँग्रेसमधील एक गट गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन भाजपची ही खेळी हाणून पाडली. काही नगरसेवक फुटले तरीही शिवसेनेच्या मदतीने आपलीच सत्ता यावी यासाठी काँग्रेसने सेफ गेम खेळली. त्याच्या बदल्यात शिवसेनेला उपमहापौरपद दिले. या दोन्हीही महापालिका मुस्लिमबहुल आहेत. तरीही शिवसेना आणि काँग्रस एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष उघडपणे एकत्र येऊन किंवा अंतर्गत एकमेकांना मदत करण्याची शक्यता आहे.

या दोन्ही पक्षांना सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातल्या नेत्यांचाही पाठिंबा मिळू शकतो. राजु शेट्टी, बच्चू कडू आणि रघुनाथदादा पाटील हे तीन मासबेस शेतकरी नेते आहेत. एनडीएमध्ये येण्यापूर्वी राजु शेट्टी यांचं टार्गेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी असंलं तरी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी हा त्यांचा यापूर्वी सर्वात मोठा शस्त्रू होता आणि आजही आहे. त्यामुळे त्यांची काँग्रेसशी जवळीक आहे. तर बच्चू कडू हे शिवसेनेशी जवळीक असणारे नेते आहेत. रघुनाथदादा पाटील तर विधानसभेला शिवसेनेसोबत होते. त्यामुळेच हे तीनही नेते काँग्रेस आणि शिवेसना युती झाल्यास त्यांच्यासोबत जाऊ शकतात. तसं झाल्यास एक मोठी ताकद भाजपच्या टक्कर देण्यासाठी निर्माण होऊ शकते. अशी आघाडी तयार झाल्यास राष्ट्रवादीचं स्थान काय असेल. ती भाजपसोबत जाणार की समाजवादी पार्टी, आरपीआयचे काही घटक, डावे पक्ष आणि इतर छोट्यामोठ्या पक्षासोबत जाते ते पहाणं उत्सुकतेच ठरेल.

COMMENTS