राज्य मंत्रीमंडळ बैठकी पूर्वी शिवसेना मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राज्य मंत्रीमंडळ बैठकी पूर्वी शिवसेना मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राज्य मंत्रीमंडळ बैठकी पूर्वी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची शिवसेना मंत्र्यांची मागणी केली आहे.

इतर राज्यात 10 हजारच्या घरात मानधन मिळते. इतर राज्यात जेवढे मानधन मिळते तेवढे मिळावे. दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाबाबतही चर्चा झाली. त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिज दुर्घटनेप्रकरणीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. रेल्वेचे सगळे ब्रिज दुरुस्त झाले पाहिजेत.  रेल्वे पुलावरील सर्व फेरीवाले हटविण्याची मागणी केली. मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्याचे आश्वासन. ही समिती पुलांबाबत निर्णय घेईल. आदी मागण्या शिवसेना मंत्र्यांनी यावेळी केल्या.

 

COMMENTS