राज ठाकरेंचा आज धडक मोर्चा, ट्रकवर उभे राहून करणार भाषण

राज ठाकरेंचा आज धडक मोर्चा, ट्रकवर उभे राहून करणार भाषण

मुंबई – परळ रेल्वेपूल चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ राज ठाकरे आज मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. स्वतः राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार असून मुंबईतल्या बहुतांश प्रवासी संघटनाही त्यात सहभाग होणार आहेत. मुंबई पोलिसांनी मात्र, अधिकृत परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे मनसे मात्र, या बहुचर्चित मोर्चावर ठाम आहे.

दुसरीकडे एल्फिन्स्टनची दुर्घटना घडल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईकर मोठा मोर्च्याच्या स्वरुपात सरकारविरोधात आपला राग व्यक्त करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरी या मोर्चाची हाक दिली असली तरी मोर्चाला सर्वच स्तरातून खूप प्रतिसाद मिळताना दिसतोय. प्रवासी महासंघानं सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलाय.मोर्चात सहभागी करुन घेण्यासाठी याआधीच प्रचारही केलाय. त्यासाठी संघटनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे स्वतः लोकलमधूनही फिरलेत.

मनसेनं या मोर्चासाठी मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा मार्ग ठरवला असून त्यासाठीच पोलीस प्रशासनाकडे परवानगीही मागितली होती. पण अद्याप परवानगी मिळालेली नाही त्यामुळे मोर्चाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि मुंबईकरांचा राग खरच व्यक्त होतो का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

COMMENTS