राज ठाकरे यांची आज फेसबुकवर एण्ट्री !

राज ठाकरे यांची आज फेसबुकवर एण्ट्री !

मुंबई  – सोशल साईट्सपासून जाणीवपुर्वक दूर राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर फेसबुकवर येत आहेत. राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजचं आज प्रकाशन होतेय. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे सकाळी हा सोहळा संपन्न होतोय. या माध्यमाच्या साहायाने ठाकरे आता नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जास्तीतजास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

या फेसबुक पेजवर विविध घटना,विषयांवर त्यांच्या अधिकृत प्रतिक्रिया,भूमिका व्यक्त होतील. तसेच त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्र असतील. फेसबुकचे हे माध्यम जणू त्यांच्या राजकीय पक्षाच्या मुखपत्राप्रमाणेच काम करणार आहे. राज ठाकरेंच्या भूमिकांप्रमाणेच या फेसबुक पेजवर विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच तज्ञ अभ्यासकांचे प्रकाशित झालेले वाचनीय लेख पोस्ट केलेले पाहायला मिळतील.

 

COMMENTS