केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान आजारी असल्याने उपचारांसाठी लंडनला रवाना झाले आहेत. त्यांना हृदयाशी संबंधित आजार आहे. 14 जूनपर्यंत पासवान उपचारांसाठी लंडनमध्ये असणार आहे. त्यामुळे त्यांचा खात्याचा अतिरिक्त कार्यभार कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे. रामिवलास पासवान हे पुन्हा आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारेपर्यंत बिनखात्याचे मंत्री असा त्यांचा दर्जा असेल, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Older Post
गोमांस बंदी उठवू; भाजप उमेदवारांचे आश्वासन
COMMENTS