रावसाहेब दानवेंच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्याला अटक

रावसाहेब दानवेंच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्याला अटक

औरंगाबाद – भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीए असल्याचं सांगून अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. गणेश बोरसे असं या ठग व्यक्तीच नाव आहे. रावसाहेब दानवे यांना या प्रकराणाची माहिती मिळाली असता त्यांनीच सापळा रचून त्याला पकडण्यात आले आहे.

या ठगाने लोकांकडून फक्त पैसैच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं बनावट ऑर्डर काढून लोकांना वितरीतसुद्धा केली आहे. कुणाची बदली करून देणे, अडकलेले सरकारी काम करून देणे, सरकारी नियुक्ती करून देणे, असली कामे करून देतो असल्याचं सांगून गणेश बोरसे लोकांकडून पैसै घेत होता. अगदी अनेक वरिष्ठ सरकारी अधिका-यांकडून सुद्धा त्यानं लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकांकडून काम करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी जमवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवती आहे. उद्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या चौकशीतून अनेकांची नाव पुढं येण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS