राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, काल झालेल्या बैठकीनंतर विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी शरद पवार यांची मनधरणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्ष केवळ सरकारकडून उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, हा उमेदवार सहमतीचा नसेल तर शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पुढे केल जाणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकी राष्ट्रपतीपदासंदर्भात काही ठोस चर्चा झाली नसली तरी वेळ पडल्यास शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत उतरवण्याचा मतप्रवाह पुढे येताना दिसला.
COMMENTS