नितीश कुमार – मोदी भेटीने विरोधकांच्या पोटात गोळा…..

नितीश कुमार – मोदी भेटीने विरोधकांच्या पोटात गोळा…..

सरकारनं राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्वसमावेशक दिला नाही तर विरोधकांकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरू केलेत. त्याच्यासाठी काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याघरी विरोधकांची बैठक झाली. या बैठकली एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेतेही उपस्थित होते. अखिलेश सिंह – मायावती, मतता बॅनर्जी – डाव्या पक्षांचे नेते, असं असताना निमंत्रण देऊनही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याऐवजी शरद यादव या बैठकीला उपस्थित होते. उलट नितीशकुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. विरोधकांच्या ऐक्याला यामुळे सुरुंग लागतो की काय अशी भीती विरोधकांना लागली आहे. 2019 मध्ये नितीश कुमार यांना विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार प्रोजेक्ट करण्याची चर्चा सुरू असताना नितीशकुमार यांनी थेट पंप्रधानांची भेट घेतल्याने भुवया उंचावल्या आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मोदींची आणि नितीशकुमारांची जवळीक वाढली आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

COMMENTS