राष्ट्रपती निवडणुकीत राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची 6 ते 10 मते फुटली ?

राष्ट्रपती निवडणुकीत राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची 6 ते 10 मते फुटली ?

मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटण्याची कुणकुण लागताच मतदानाच्या एक दिवस आधी दोन्ही पक्षांनी आमदारांची बैठक घेतली होती. तरीही आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदान आकडेवारीनुसार राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची 6 मते फुटली असल्याचं दिसून येतंय. युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना आघाडीची फक्त 77 मतं मिळाली. काँग्रेसची 42 आणि राष्ट्रवादीची 41 अशी 83 मतं मिळायला हवी होती. मात्र त्यांना फक्त 77 मतं मिळाली. याचाच अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 6 मतं फुटली आहेत. तसंच  तसेच शेकाप, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि अप़क्षांची मतेही कोविंद यांना मिळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. समाजवादी पार्टी आणि एमआयएमनं मीराकुमार यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानुसार त्यांनी मीराकुमार यांना मतदान केलं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीची 10 मते फुटली असण्याची शक्यता आहे.

COMMENTS