राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पितृशोक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पितृशोक

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचे वडील सतीश भाऊराव आव्हाड यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. 
सतीश आव्हाड यांनी कळव्यातील मुकंद कंपनीत कार्यरत असताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी लढा उभारला होता. मराठी साहित्याची त्यांना विशेष गोडी होती. त्यांनी एका पुस्तकाचे लिखाणही केले होते. त्यांच्या पश्चात, मुलगा, सून, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

 

 

COMMENTS