विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार आणि घोटाळा केल्याचा आरोप राजकीय पक्षाकडून करण्यात येत आला होता. त्यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखवाच असे खुले आव्हान दिले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान स्वीकारले आहे.
आयोगाने दिलेल्या ‘हॅकिंग चॅलेंज’ला 3 जूनपासून सुरुवात होणार आहे. आम आदमी पक्ष,काँग्रेस, बसपासह देशातील काही राजकीय पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याच्या आरोप केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीका झाली होती. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी सर्व राजकीय पक्ष आणि देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना ईव्हीएम हॅकिंग चॅलेंज दिले होते.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आव्हानला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिसाद दिला आहे. 3 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, गौरव जयप्रकाश जाचक आणि यासिन हुसैन शेख आदी नेते निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारतील. यासाठी आयोगाने पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून ईव्हीएम आणले आहेत.
COMMENTS