‘राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे’

‘राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे’

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही के थॉमस यांनी जुन्या काँग्रेस नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाशी लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे अशी विनंती थॉमस यांनी केलीय. जर हे विलीनीकरण शक्य नसेल तर बिगर भाजप पक्षांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली आघाडी करावी असा सल्लाही त्यांनी दिलाय. असं झालं तर राहुल गांधी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकतील असंही थॉमस म्हणाले. काँग्रेस परिवारातील शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्या सारख्या नेत्यांनी काँग्रेससोबत राष्ट्रीय पातळीवर आघाडी करावी मात्र त्यांच्या पक्षाचं विलीनीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचंही थॉमस यांना वाटतंय. युपीए 1 आणि युपीए 2 च्या काळात सोनिया गांधी यांनी आघाडीचे नेतृत्व उत्तमपणे केले. त्याच धर्तीवर आता त्याची पुनरावृत्ती व्हावी असंही थॉमस म्हणाले.

COMMENTS