राहुल गांधींच्या खांद्यावर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा ?

राहुल गांधींच्या खांद्यावर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा ?

नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गांधी यांचे निकटवर्तीय माजी मंत्री सचिन पायलट यांनी हा खुलासा केला आहे. दिवाळीनंतर हा बदल होवू शकतो, असे संकेत त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिले.
राहुल गांधी यांच्या उपाध्यक्षापदाच्या कारकीर्दीला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी पक्षात भावना आहे. गुजरातच्या 3 दिवसीय दौऱ्यानंतर ते पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. वय आणि अनुभवाची ते योग्य प्रकारे सांगड घालतील असे काँग्रेस नेते  मिलिंद देवरा यांनी देखील म्हटले आहे.

 

COMMENTS