लखनऊ – निधी उपलब्ध होत नसल्याने अमेठी मतदारसंघातील कामे पैशांअभावी रखडली आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना निधी उपलब्ध झालेला नाही. राहुल गांधी यांच्या खासदार निधीच्या खात्यात शेवटचा निधी 2015-16 मध्ये जमा झाला होता. तेव्हापासून या खात्यात एकही पैसा जमा झाला नाही. खात्यात पैसा जमा का होत नाही हे विचारण्यासाठी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले परंतु अद्याप त्याला उत्तर मिळाले नाही. राहुल गांधी यांच्या खासदार निधीला ब्रेक लागला असल्याने त्यांच्या मतदारसंघातील प्रस्तावित कामे रखडली असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस समितीने केला आहे.
खासदार निधीअंतर्गत पावणे पाच कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये 463 संपर्क मार्ग, सोलर प्लाण्ट, प्रवासी प्रतीक्षालय, शाळांचे नुतनीकरण यासारख्या कामांचा समावेश आहे. अमेठी मतदारसंघात तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील अमेठीचा मोठा भाग आहे. तर सुलतानपूर आणि रायबरेलीमधील काही भागाचा समावेश आहे.
COMMENTS