राहुल गांधी ऑक्टोबरमध्ये होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

राहुल गांधी ऑक्टोबरमध्ये होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकींचा कार्यक्रमच काँग्रेस पक्षाने जाहीर केला आहे. याच निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड होईल. राहुल गांधी यांची या पदावर निवड निश्चित मानली जात आहे. सोनिया गांधी या गेली 19 वर्षापासून काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षदाची माळ सोपवली जाण्याची शक्यता आहे.

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्याचे संकेत दिले होते. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 2015 मध्येच होणे अपेक्षीत होते. मात्र काही कारणांमुळे ती होऊ शकली नाही. निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करुन अध्यक्षाची पुन्हा निवड करण्यात यावी असे सांगितले आहे. पक्षाने दरवेळी मुदतवाढ करुन घेतली परंतु आता यावेळी मात्र जून २०१७ पर्यंत सदस्य नोंदणी पूर्ण करुन ही प्रक्रिया आम्ही लवकर संपवू असे काँग्रेसने निवडणूक आयोगाला कळवले होते.

COMMENTS