उस्मानाबाद – रस्त्या कामाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी कंत्राटदाराकडे 5 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने लाचलुचत प्रतिबंधक विभागाने सौंदना (ढोकी, ता. कळंब) येथील महिला सरपंचावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, एरंडगाव (ता. कळंब) येथे सिमेंट रस्त्याचे काम तक्रारदाराने केले होते. या रस्त्याच्या कामाच्या एकूण बिलापैकी उर्वरीत 10 हजार रुपयांचा धनादेश मिळालेला नव्हता. तो धनादेश त्यांना देण्यासाठी सौंदना ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मालनबाई रामा कोळी यांनी 5 हजार रुपयांची लाच 20 जुलै रोजी मागितली होती. तशी तक्रार संबंधित कंत्राटदाराने केली होती. पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. जी. आघाव, व्ही. आर. बहीर यांनी तक्रारीची शहानिशा केली. त्यात सरपंच कोळी यांनी लाच मागितल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे आज येरमाळा पोलिस ठाण्यात सरपंच माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS