लातूर – शासनाने सोयाबीनिला जाहीर केलेले प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान अजुनही शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही, त्यामुळे ते वसूल करण्यासाठी शेतकरी संघटना 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी पालकमंत्र्यांच्या घरावर वसुली मोर्चा काढणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारने सोयाबीनसाठी अनुदान जाहीर केले होते. 1 आक्टोबर ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनसाठी ते देय होते. त्याची मर्यादा 25 क्विटंलपर्यंत होती. हे अनुदान मिळावे, यासाठी जानेवारी महिन्यात लातूर जिल्ह्यातील 11 बाजार समित्यांकडे 58 हजार 625शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्याअंतर्गत 19 कोटी 39 लाख,46हजार 422 रुपये सरकारकडून मिळणे व त्यावेळीच ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणे अपेक्षीत होते. सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांना ही रक्कम अद्यापही मिळाली नाही.
COMMENTS