लातूर – लातूर महापालिकेत ऐतिहासीक विजय मिळवलेल्या भाजपला स्थायी समितीच्या निवडणुकीत मात्र धक्का बसला आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभवाची चव चाखावी लागली आहे.
स्थायी समितीच्या आज झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीश वाघमारे आणि काँग्रेसचे उमेदवार अशोक गोंविदपूरकर यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक गोविंदपूरकर यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यामुळे सत्ता मिळवूनही तिजोरीच्या चाव्या मात्र काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत.
COMMENTS