लोकसभा निवडणूक 2018 मध्ये होणार ?

लोकसभा निवडणूक 2018 मध्ये होणार ?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एक धक्का देण्याच्या शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुका या मुदतीपूर्वीच घेण्याचा विचार करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुका नियमानुसार एप्रिल ते जून 2019 दरम्यान होणं अपेक्षित आहे. मात्र  मोदी-शाह त्यापूर्वीच म्हणजे 2018 च्या शेवटी लोकसभा निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात भाजपशासित राज्यांच्या 13 मुख्यमंत्र्यांची आणि सहा उपमुख्यमंत्र्यांची मोदी-शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. ही बैठक याच दृष्टीने घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. 2019 पर्यंत देशातील परिस्थिती काय असेल, सरकारसमोर कोणत्या अडचणी उभ्या राहतील, याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. त्यापेक्षा 2018 पर्यंत सरकारबद्दल सकारात्मकता कायम राहून, कमी संकटं असतील. शिवाय 10-12 महिने सत्तेचा मोह सोडल्यास आणि 5 वर्ष सत्ता मिळू शकते, असं गणित भाजपचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

COMMENTS