दिल्ली – लोकसभेमध्ये आज शेतक-यांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरकार आणि पोलीस शेतक-यांवर दडपशाही करत असल्याचा घणाघाती आरोप खासदार राजु शेट्टी यांनी केला. शेतकरी काय दहशतवादी आहेत काय ? असा सवाल करत शेतक-यांवर दडपशाही करणा-या सरकारचा निषेध करत शेट्टी यांनी सभात्याग केला. शेतक-यांना झालेल्या मारहाणीची सीबीआय चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी गोंधळ घालणा-या भाजपच्या खासदारांना राजु शेट्टी यांनी चांगलेच खडसावले. गेल्यावेळी मी तुमच्यासाठी शेतक-यांनाकडे मते मागितली. शेतक-यांच्या प्रश्नावर का बोलू दिले जात नाही ? मोदींनी आश्वासन दिले पण ते पाळलं का नाही ? असा सवार शेट्टी यांनी केला. तर राजू शेट्टी हे शेतक-यांच्या प्रश्नाचे राजकारण करत असल्याची टीका भाजपच्या खासदारांनी केली.
COMMENTS