लोणावळ्यात भाजपला धक्का, पालिकेतील गटनेत्याचं जात प्रमाणपत्र रद्द !

लोणावळ्यात भाजपला धक्का, पालिकेतील गटनेत्याचं जात प्रमाणपत्र रद्द !

लोणावळा नगरपरिषदेतील भाजपचे गटनेते भरत हरपुडे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. भरत हरपुडे यांचे ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीनं रद्द केलं आहे. त्यामुळे हरपुडे यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. कुणबी जात प्रमाणपत्रावर इतर मागास प्रवर्गातून हरपुडे यांनी निवडणूक लढवली होती. भरत हरपुडे पाणी पुरवठा समितीचे सभापती देखील आहेत. जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने लवकरच त्यांचे नगरसेवक पद देखील रद्द होऊ शकते. सत्तारूढ भाजपला धक्का हा धक्का मानला जात आहे. डिसेंबर 2016 मध्ये लोणावळा नगरपालिकेची निवडणूक झाली होती.

COMMENTS