सैनिकांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझम खान यांच्याविरोधात कलम 124 अ, 131 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनिल पांडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझम खान यांनी भारतीय सैन्याच्या जवानांवर अप्रत्यक्षपणे बलात्काराचा आरोप केला होता. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर व्हायरल झाला होता. यात त्यांनी दहशतवाद्यांना भारतीय सैन्यातील जवानांच्या हात-पाय आणि डोक यावर आक्षेप नसून त्यांनी जवानांचे गुप्तांग कापून नेले. कारण दहशतवाद्यांना ‘त्याच शरीराच्या भागाचा आक्षेप होता. या घटनेमुळे देशाची नाचक्की झाली आहे. अशावेळी आपण जगाला काय तोंड दाखवणार आहोत, असे म्हटले होते.
COMMENTS