…मग युतीचं झाड कसे बहरणार ?

…मग युतीचं झाड कसे बहरणार ?

नवी मुंबई – राज्यभरात आज वनमंत्रालयातर्फे कृषी दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतही वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र आजच्या कार्यक्रमाला येणं उद्धव ठाकरे यांनी टाळलं. उद्धव यांच्याऐवजी शिवसेनेकडून सार्वजनिक बांधकामंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला होता. उद्धव यांनी त्यावेळी सोनचाफा हे झाड लावलं होतं. तर मुख्यमंत्र्यांनी त्याला खत आणि पाणी घातलं होतं. आणि भाषणातही मुख्यमंत्र्यांनी युतीचे झाड बहरेल असा उल्लेख केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. युतीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी दांडी मारली की काय अशीही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच आता युतीचे झाड कसे बहरणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जाऊ लागला आहे.

COMMENTS