मराठा मोर्चा अपडेट – उद्या दक्षिण मुंबईत सुट्टी

मराठा मोर्चा अपडेट – उद्या दक्षिण मुंबईत सुट्टी

 मुंबई – मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ उद्या मुंबईला धडक देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जवळपास 500 शाळा उद्या बंद राहणार आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांना सुट्टी राहील.

मुंबईतील भायखळा येथून सकाळी 11 वाजता मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात अंदाजे 5 लाख लोक सहभागी होतील, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल, असा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.  दरम्यान, मोर्चात मुंबईचे डबेवालेही सहभागी होणार असून उद्या सेवा बंद राहील, अशी माहितीही देण्यात आली.

COMMENTS