विधानपरिषदेत नारायण राणे विरुद्ध अनिल परब जुगलबंदी

विधानपरिषदेत नारायण राणे विरुद्ध अनिल परब जुगलबंदी

मुंबई – विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब आणि काँग्रेसचे ज्य़ेष्ठ आमदार नारायण राणे यांच्यात आज विधान परिषदेमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. 

कोण काय म्हणाले ?

अनिल परब

शिवसेनेची  काय ताकद आह हे तुम्हाला चांगले माहिती आहे. शिवसेनेमुळे तुम्ही खालच्या सभागृहात राजे होता पण दुर्दैवाने आज तुम्हाला शिवसेनेमुळेच या सभागृहात यावे लागले. शिवसेनेच्या ताकदीची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही गेल्यावर देखील शिवसेनेनं 2007, 2012 आणि 2017 या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली. तुमची भाजप प्रवेशाची चर्चा होती त्यानुसार तुम्ही भाजपात गेला असता तर आज जीएसटीच्या बाजूनं बोलला असता. शिवसेनेची चिंता करु नका.

नारायण राणे

मी शिवसेनेची ताकद कमी झाली हे वस्तुस्थिती पाहून बोलतोय. उगाच बोलत नाही. अकोल्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले. त्याचा संदर्भ घेऊन मी बोललो. शिवसेनेत पुर्वी ज्याप्रमाणे बोललेलं घडायचं तसं घडत नाहीये. लोकशाहीत सत्तेत असणाऱ्यांनी सत्तेच्या बाजूने बोलायचे असते. विरोधात नाही. असं मला सांगायचं होतं.

COMMENTS