गोव्यामधील विधानसभेच्या पोटिनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दोन्ही जागा भाजपनं जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून एकतर्फी विजय मिळवला आहे. तर वालपोई मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले विश्वजित राणे विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री पर्रीकर पणजी येथून सहाव्यांदा विजयी झाले आहेत. पर्रीकर यांचा 4 हजार 803 मतांनी विजयी झाले आहेत. मनोहर पर्रिकर यांना 9862 मते मिळाली तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीष चोंडकर यांना 5059 मते मिळाली. तर भाजपचे विश्वजीत राणे हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. राणे यांना 16188 मते मिळाली तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नाईक यांना 6101 मते मिळाली.
COMMENTS